अनैतिक संबधातून महिलेचा खून, हातकणंगलेतील घटना; दोरीने गळा आवळला अन्…

हातकणंगले औद्योगिक वसाहातीकडे जाणाऱ्या मार्गावर चौगुले-खोत गल्ली येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबधातून दोरीने गळा आवळून रूपाली दादासो गावडे या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.

    हातकणंगले : हातकणंगले औद्योगिक वसाहातीकडे जाणाऱ्या मार्गावर चौगुले-खोत गल्ली येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबधातून दोरीने गळा आवळून रूपाली दादासो गावडे या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत नागेश गुड्डापा काळे (राहणार आगाशीनगर, मलकापूर, सध्या राहणार माळवाडी हिंगणगाव) यांनी हातकणंगले पोलिसांत फिर्याद दिली आहे.

    हातकणंगले पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हातकणंगले येथील राजदीप खोत यांच्या मालकीच्या घरी मयत रूपाली दादासो गावडे (वय २८, सध्या राहणार हातकणंगले, मुळ गाव बागण, ता. वाळवा) सहा वर्षांपासुन माहेरी हिंगणगांव (ता. हातकणंगले) येथे राहत होती. चार दिवसांपूर्वी हातकणंगले येथील खोत-चौगुले गल्ली येथील राजदिप खोत यांच्या मालकीच्या खोलीमध्ये भाडेकरू म्हणून राहण्यास आली होती.

    मयत रूपाली गावडे गेल्या सहा वर्षापासुन विभक्त राहत होती. दरम्यान संशयीत आरोपी प्रकाश शेखर हदिमनी (वय ३५, रा. हिंगणगांव ता. हातकणंगले) यांच्यात अनैतिक संबंध होते. मात्र संशयीत आरोपी प्रकाश हदिमनी हा नेहमी तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करायचा. सोमवारी रात्री आरोपी प्रकाश हदिमनी व मयत रूपाली गावडे यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला व आरोपी प्रकाश याने रूपालीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. मंगळवारी घटना सकाळी उघडकीस आली.

    संशयित आराेपीचा शाेध सुरू

    संशयित आरोपी प्रकाश हदिमणी हा गायब झाला आहे. गळ्याभोवती दोरीचे व्रण आढळुन आले असून, हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव खेडकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयत रूपाली गावडेच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तिचा शोध घेण्याचे काम सुरु असून श्वानपथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.