आईचा अपमान केला म्हणुन तरुणाचा खून

मंगळवारी रात्री चंद्रपुरातील ज्यूबिली शाळेच्या आवारातील शासकीय इमारतीच्या अंदाजे 25 वर्षीय युवकाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.

    चंद्रपूर – आईचा अपमान ( Murder of Young Man ) केला म्हणुन आरोपीने मृतकाला मारहाण केली होती. मात्र, यानंतरही त्याच्यातला संताप क्षमला नाही. नाशिकमधून चंद्रपुरात येऊन त्याने तरुणाची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला आणि हत्येचे रहस्य उलगडले.

    मंगळवारी रात्री चंद्रपुरातील ज्यूबिली शाळेच्या आवारातील शासकीय इमारतीच्या अंदाजे 25 वर्षीय युवकाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतक युवकाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यावर मृतकाची ओळख पटविण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला.