शिवीगाळ केल्याने जिवलग मित्राचा खून ; मृतदेह नाल्यात फेकला

दोन मित्रांनी तिसऱ्या जिवलग मित्राचा केवळ शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चाकूने वार करत खून केला. खून केल्यानंतरमित्राचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. मित्राच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार देताच दोघे मित्र पळून गेले. पोलिसांनी तपास करतदोघांना अटक केली.पंकज रतन पाचपिंडे (२८, रा. थेरगाव), अमरदीप उर्फ लखन दशरथ जोगदंड (३३, रा. थेरगाव गावठाण. मूळ रा. अंबाजोगाई, परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरज उर्फ जंजीर कांबळे (३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्या मित्राचे नावआहे.

    पिंपरी : दोन मित्रांनी तिसऱ्या जिवलग मित्राचा केवळ शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चाकूने वार करत खून केला. खून केल्यानंतरमित्राचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. मित्राच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार देताच दोघे मित्र पळून गेले. पोलिसांनी तपास करतदोघांना अटक केली.पंकज रतन पाचपिंडे (२८, रा. थेरगाव), अमरदीप उर्फ लखन दशरथ जोगदंड (३३, रा. थेरगाव गावठाण. मूळ रा. अंबाजोगाई, परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरज उर्फ जंजीर कांबळे (३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्या मित्राचे नावआहे.

    पोलीस उपायुक्त डॉ काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कांबळे यांच्या पत्नी आरती कांबळे यांनी 7 ऑक्टोबर रोजीसुरज कांबळे हा बेपत्ता असल्याची तक्रार केली. मात्र सुरुवातीला पोलिसांना सुरज कांबळे याचा शोध लागला नाही. दरम्यान ११ ऑक्टोबर रोजी आरती कांबळे यांनी पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये पती सुरज हा मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंडयांच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला. त्यानंतर तो घरी आला नसल्याचे सांगितले. पोलिसांनी पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंडयांच्याकडे चौकशी करण्यासाठी त्यांचा शोध घेतला असता ते देखील कोठेतरी निघून गेले असल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांवरपोलिसांचा संशय बळावला.

    पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधला असता दोघेजण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी अंबाजोगाई येथून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, पाचऑक्टोबर रोजी सुरज कांबळे आणि आरोपी हे पंकज पाचपिंडे यांच्या घरात दारू पिण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी सुरज कांबळे यांनीअश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या रागातून पंकज आणि अमरदीप यांनी चाकूने सुरजच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला.

    त्यानंतर पंकज चालवत असलेल्या तीन चाकी टेम्पो मध्ये सुरजचा मृतदेह एका गोधडीत गुंडाळून ठेवला. टेम्पो बावधन येथे नेऊनगायकवाड वस्ती येथील महामार्गाखालून वाहणाऱ्या नाल्यामध्ये आरोपींनी सुरजचा मृतदेह टाकून दिला. त्यानंतर ते दोघे दोन दिवसकाहीच घडले नाही अशा अविर्भावात राहिले. दरम्यान, सात ऑक्टोबर रोजी सुरज कांबळे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिली असल्याचे आरोपींना समजले. त्यानुसारआरोपींनी आरती कांबळे यांची घरी जाऊन भेट घेतली. पाच ऑक्टोबर रोजी आम्ही त्याच्यासोबत दारू प्यायलो होतो. परंतु दारूपिल्यानंतर तो मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घरी परत गेला, असे आरोपींनी आरती यांना सांगितले. सुरज बेपत्ता झाल्याची तक्रारदाखल झाल्याने पोलीस आपल्याकडे देखील चौकशी करतील या भीतीने दोघे आरोपी ८ ऑक्टोबर रोजी पसार झाले. अमरदीपजोगदंड हा बीड जिल्ह्यात राहत असल्याने आरोपींनी त्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोपींनी पोलीस तपासात सांगितले.