बहिणीला त्रास देत असल्याने मेव्हण्याचा खून

बहिणीला त्रास देत असल्याने १९ वर्षीय तरुणाने आणि त्याच्या मित्राने मेव्हण्याचा खून केल्याची घटना बालेवाडी येथील पाटील वस्तीत घडली. खूनानंतर आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

    पुणे : बहिणीला त्रास देत असल्याने १९ वर्षीय तरुणाने आणि त्याच्या मित्राने मेव्हण्याचा खून केल्याची घटना बालेवाडी येथील पाटील वस्तीत घडली. खूनानंतर आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. राजेंद्र कुमार कांबळे (वय २४, रा. बालेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बाब्या व राहुल रिकामे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा बिगारी काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच तो पुण्यात आला होता. बालेवाडी येथील पाटील वस्तीत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान, तो पत्नीला त्रास देत होता. तिला मारहाण करत होता. त्याचा राग पत्नीचा भाऊ बाब्या याला आला होता. दरम्यान, बुधवारी रात्री वाद झाल्यानंतर दोघांनी राजेंद्र याचा खून केला. गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.