रत्नागिरीतील भयानक घटना, निर्जन जागेचा फायदा घेत कॉलेजच्या विद्यार्थिनीवर ५५ वर्षीय व्यक्तीने केला हल्ला, एकीचा मृत्यू एक गंभीर जखमी

आज दुपारी 12 वाजता साक्षी आणि रिद्धी या कॉलेज सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी येत होत्या. यावेळी एका निर्जनस्थळी विनायक गुरव हा माणूस दबा धरून बसला होता. या दोघी निर्जनस्थळी येताच त्याने दोघींवर हल्ला केला. यात साक्षी गुरव या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला.

    राजापूर: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात एक भयानक घटना घडली आहे. कॉलेजच्या विद्यार्थीनींवर एका 55 वर्षीय माणसाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू (Death) झाला आहे. निर्जन ठिकाणी संशयिताने दोन्ही विद्यार्थिनींवर हल्ला केला. यात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. साक्षी गुरव असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर रिद्धी गुरव असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. जखमी रिद्धीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक गुरव असे हल्ला केलेल्या संशयिताचे नाव आहे.

    आज दुपारी 12 वाजता साक्षी आणि रिद्धी या कॉलेज सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी येत होत्या. यावेळी एका निर्जनस्थळी विनायक गुरव हा माणूस दबा धरून बसला होता. या दोघी निर्जनस्थळी येताच त्याने दोघींवर हल्ला केला. यात साक्षी गुरव या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. तर रिद्धी गंभीर जखमी झाली. विनायक याने या दोघींवर हल्ला का केला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धारतळे या ठिकाणी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या साक्षी आणि रिद्धी गुरव नेहमीप्रमाणे आपल्या घरी परतत होत्या. धारतळे – भालावली रस्त्यावरत दुपारी 11.30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अचानक या दोघींवरती हल्ला झाला. यामध्ये साक्षी गुरव या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर रिद्धी गुरव हिला जखमी अवस्थेत जवळच्या धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्राथमिक उपचारानंतर रिद्धी गुरव हिला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

    दरम्यान, या हल्ल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर विनायक गुरव हा भालावली गावातीलच रहिवासी आहे. या हल्ल्यामागे घरगुती वादाची पार्श्वभूमी असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, याला पोलिसांकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. घरगुती वाद असल्यास मुलींवर हल्ला कसा केला जाईल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहेत. तपासानंतरच हा हल्ला का केला याबाबतची माहिती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.