Thrill of two murders in the district! The father killed his son for money

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुर्गापूर परिसरात त्याच्यावर ३ ते ४ जणांनी हल्ला केला.  आधी त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली

    चंद्रपूर  : चंद्रपुरातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. महेश मेश्राम असं या गन्हेगाराचं नाव आहे.  नुकताच तो पॅरोलवर सुटला होता. मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याच धड शरीरापासून वेगळं केलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मृतक महेशवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच तुरुंगातुन पॅरोलवर बाहेर आला होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुर्गापूर परिसरात त्याच्यावर ३ ते ४ जणांनी हल्ला केला.  आधी त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी एव्हड्यावरच न थांबता त्याच मुंडकही धडावेगळं केलं. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

    ही हत्या नेमक्या कोणत्या कारणमुळे झाली या उलगडा अजून झाला नसून , हा  खून पूर्ववैमनस्यातून  झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे दोघांना अटक केली आहे.