पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे आला संशय; संतप्त पतीने होमगार्डची केली हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका गृहरक्षकावर भरदिवसा महामार्गावर हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला (Attack with Hokey Stick) केल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत गाडीत टाकण्यात आले. त्यानंतर तिरोडी ता कटंगी, जिल्हा बालाघाट (म.प्र.) येथे फेकून आरोपी पळून गेले.

    कन्हान : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका गृहरक्षकावर भरदिवसा महामार्गावर हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला (Attack with Hokey Stick) केल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत गाडीत टाकण्यात आले. त्यानंतर तिरोडी ता कटंगी, जिल्हा बालाघाट (म.प्र.) येथे फेकून आरोपी पळून गेले. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी 12 ते 1 या वेळेत नागपूर जबलपूर महामार्गावरील बोर्डा शिवार चौकातील बसस्थानकात घडली.

    आशिष ऊर्फ सोनू दिलीप पाटील (27) रा. गोंडेगाव असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये कुणाल राजेश नाईक आणि अन्य दोघांचा समावेश आहे. होमगार्ड असणारा आशिष कुणालच्या घराशेजारी राहायचा. दोघे मित्रही होते. नागपूर-जबलपूर चौपदरी महामार्गावरील बोर्डा शिवार चौकात दुपारी कुणाल नाईक व अन्य दोन जणांनी आशिषवर हॉकी स्टिकने हल्ला केला आणि कारमधून पळवून नेले.

    घटनास्थळी रक्त आणि दुचाकी दिसल्याची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. जखमीबाबत कन्हान कामठी नागपूर येथील रुग्णालयात कोणतीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी जखमी व आरोपींचा शोध सुरू केला. टोल बुथवर आरोपी जखमीला घेऊन गोंदियाच्या केनोर येथे गेल्याचा सुगावा लागला. एक चाक पंक्चर झाल्यानंतरही आरोपी गाडी चालवतच असल्याने दुसरे चाकही पंक्चर झाले. त्यांनी आशिषचा मृतदेह मध्य प्रदेशातील तिरोडी येथे रस्त्यावर फेकून दिला आणि पळून गेले.

    पोलिस चौकशीत आशिषचे कुणालच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एक-दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे. तिरोडी पोलिसांनी आशिषचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.