उधारीच्या वादातून वृद्धाचा खून, मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत; लांजाळा येथील घटना

उधारीच्या वादातून वृद्धाचा खून (Murder of Old Age Man) केल्याची घटना कुही पोलिस स्टेशनअंतर्गत लांजाळा येथे घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. मनोहर मासुरकर (वय 65) असे मृतकाचे तर देवानंद तुळशीराम धांडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    मांढळ : उधारीच्या वादातून वृद्धाचा खून (Murder of Old Age Man) केल्याची घटना कुही पोलिस स्टेशनअंतर्गत लांजाळा येथे घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. मनोहर मासुरकर (वय 65) असे मृतकाचे तर देवानंद तुळशीराम धांडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आंभोरा मार्गावरील सिद्धेश्वर खदानी मागे उंद्री परिसरात कुजलेला अवस्थेत मानवी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मतदेहाच्या ओळखीसाठी परिसरातील नागरिकांची मदत घेतली. हरविल्याची तक्रार देणाऱ्यांनाही बोलावण्यात आले. मनोहर यांची मुलगी कविता बंडू गजभिये ही पाचगाव पोलिस चौकीत आली व मृतदेह तिच्या वडिलांचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. प्रकरणाच्या तपासात गावातील देवानंद धाडे याच्यासोबत उधारीच्या पैशाचा वाद झाला असल्याचे समोर आले.

    संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात उमरेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार व कुहीचे ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या पथकाने पार पाडली.