चार भावांनी चुलतभावाचं अख्खं कुटुंब संपवलं, दौंडचं भिमानदीत ७ जणांचं भीषण हत्याकांड का घडलं? पोलिसांनी सांगितलं खरं कारण; सख्या चार भावांना व बहिणीला ठोकल्या बेड्या

दरम्यान, अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवारचा काही महिन्यांपुर्वी पुण्यात अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला मोहन पवार व त्यांचे कुटूंब जबाबदार असल्याचा संशय होता. त्याबाबत त्यांच्या मनात राग होता. त्या रागातून चार भाऊ व बहिणीने त्यांच्या खूनाचा कट रचला. त्यानंतर या कुटूंबाची हत्या केली.

  पुणे- जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत सापडलेल्या “त्या” सात जणांची हत्या झाल्याचे धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. सख्या पाच चुलत भावांनीच या कुटूंबाची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिले. मुलाचा मृत्यू झाल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले असून, याप्रकरणात पाच भाऊ व त्यांच्या एका बहिणाला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले आहे. कुटुंबाने सुरूवातील आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. 3 चिमुरड्यासह 7 जणांचा खून झाला आहे.

  पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ४०), श्याम कल्याण पवार (वय ३० ),प्रकाश कल्याण पवार (वय २४) व शंकर कल्याण पवार (वय ३२) आणि त्यांची बहिण अशा पाच जणांना अटक केली आहे. तर, या घटनेत मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय 32), पत्नी राणी शामराव फुलवरे (वय 27), त्यांचा मुलगा रितेश शामरावर फुलवरे (वय 7), छोटू शामराव फुलवरे (वय 5) व कृष्णा फुलवरे (वय 3) अशी खून झालेल्या कुटूंबाचे नाव आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात खून, कट रचणे यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  मोहन पवार हे मुळचे नगर जिल्ह्यातील आहेत. काही महिन्यांपुर्वी कामानिमित्त पवार कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. दरम्यान, अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवारचा काही महिन्यांपुर्वी पुण्यात अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला मोहन पवार व त्यांचे कुटूंब जबाबदार असल्याचा संशय होता. त्याबाबत त्यांच्या मनात राग होता. त्या रागातून चार भाऊ व बहिणीने त्यांच्या खूनाचा कट रचला. त्यानंतर या कुटूंबाची हत्या केली.

  अंधश्रध्देचा प्रकार सध्यातरी पुढे आलेला नाही- गोयल
  दरम्यान पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परीषदेत बोलतातना कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती दिली. दरम्यान हा अंधश्रध्देचा प्रकार आहे की नाही हे आताच्या तपासात उघड झालेले नाही. आरोपींच्या पोलिस कोठडीतून हे उघड होईल. आणखीही आरोपी असू शकतात. चार भाऊ व एक बहिणीला आतापर्यंत अटक केलेली आहे असे गोयल यांनी सांगितले.

  हत्या झाली कशी हे अस्पष्टच…
  जिल्ह्यातील एका पुर्ण कुटूंबाचीच हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पण हत्या नेमकी कशी झाली हे मात्र अस्पष्टच आहे. कारण, मृतदेह नदीत मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रथम खून झाला आणि नंतर त्यांचे मृतदेह फेकले गेले की, त्यांना नदीपात्रात फेकून दिले. तसेच, त्यांना औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत फेकण्यात आले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत पोलिसांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबतचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

  का केली हत्या
  आरोपी पळून जाऊ नयेत, तसेच यातील खरा प्रकार समोर यावा यासाठी पोलिसांनी गुप्तता पाळली आणि आज पहाटे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केली, तर दुपारी एक वाजता यातील फरार महिलेलाही अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले. मोहन पवार यांचा पुण्यातील मुलगा राहूल याच्या सांगण्यानुसार मुलाने पळवून नेलेल्या विवाहित मुलीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी तपास सोडला नाही आणि त्यातून आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले. ते म्हणजे मोहन पवार यांचा मुलगा अमोल हा चुलतभाऊ अशोक पवार यांचा मुलगा धनंजय याच्याबरोबर पुण्यात गेला होता. तिथे अपघात झाला आणि धनंजय गंभीर जखमी झाला. त्याला तिथेच सोडून अमोल घरी आला. चार दिवसांनी पुण्यात या अपघातग्रस्त मुलाचा मृत्यू झाला. अमोल त्याच्यासोबत असल्याचे सीसीटिव्हीतून लक्षात आल्याने अमोलनेच घातपात केला असावा असा संशय मोहन पवार यांच्या चुलतभावांमध्ये बळावला. अमोल यानेच आपल्या मुलाचा अपघात घडवून आणल्याचा संशय शाम व प्रकाश पवार या मोहन पवारांच्या चुलतभावांना आला. त्यातून खूनाचा कट रचला गेला.

  अतिशय थंड डोक्याने केलेल्या दोन कुटुंबांच्या या खूनाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेत दोन कुटुंबे कायमची संपली, तर आता ज्यांनी हा खून केला, ती कुटुंबेही उध्वस्त होतील. एखाद्यावरचा राग त्याच्यापुरता सिमीत न राहता अगदी त्यांचे वंश देखील खुडण्यापर्यंत जात असेल, तर दुर्दैव आहे.