नराधम पती, पत्नीचेचं अश्लील फोटो अन् व्हिडिओ काढून नातेवाईकांना पाठविण्याची धमकी; पुण्यातील प्रकार उघडकीस

पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पतीनेच पत्नीचे चोरून अश्लील फोटो व व्हिडीओ काढत ते मित्र व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पतीनेच पत्नीचे चोरून अश्लील फोटो व व्हिडीओ काढत ते मित्र व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, चारित्र्यावर संशय घेत त्यांच्याशी भांडण करत इच्छेविरुद्ध नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ३४ वर्षीय पिडीत पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, ३९ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हा संपूर्ण प्रकार २०१४ पासून सुरू होता. पिडीत महिला व आरोपी पती पत्नी आहेत. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच, त्यावरून व कौटुबिंक कारण काढून त्यांच्याशी वाद घालत होता. त्यांना व त्यांच्या आईला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. त्यांचा मानसिक- शारीरिक छळ केला.

    तर, त्यांच्या इच्छेविरुद्ध नैसर्गिक आणि अनैसर्गिक संबंध ठेवून लैंगिक छळ केला. त्यांच्या न कळत आणि संमतीशिवाय नेकेड फोटो व खाजगी व्हिडिओ काढले. ते फोटो आणि व्हिडिओ नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना दाखवतो अशी धमकी दिली. त्यांच्या जीमेल आयडी हॅककरून त्यांच्या संपर्कातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज, मेल केले. त्यांची बदनामी केली. तसेच, डिमॅट अकाउंट ओपन करून त्याचा पासवर्ड स्वतःकडे ठेवून परस्पर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा गैरवापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.