पैशांच्या वादातून झरीफ बाबाचा खून, युट्यूबवर जादू-जिन्नपासून सुटका मिळवून देण्याचा करायचा दावा

या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरू यांचा ड्रायव्हर आणि इतर तीन जण फरार झाले असून पोलीस पथक फरार आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

    नाशिक – येवला येथील एक चिंचोली एमआयडीसी परिसरात झालेल्या अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूच्या हत्येबाबत नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील ( Nashik Superintendent of Police Sachin Patil ) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार ही हत्या सुफी यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाला आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून सुफी चिस्ती याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, या इतरही काही कारण आहे का याबाबत पोलीसांचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरू यांचा ड्रायव्हर आणि इतर तीन जण फरार झाले असून पोलीस पथक फरार आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

    युट्यूबवर चॅनल असलेला झरीफ बाबा कथित जादू आणि जिन्नपासून सुटका करून देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करायचा. नाशिक पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ख्वाजा सय्यद चिश्ती असे मृताचे नाव आहे. ४ वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमधून निर्वासित म्हणून तो भारतात आला होता. निर्वासित म्हणून केंद्र सरकारनेच त्याला देशात राहण्यास परवानगी दिली होती. सुरुवातीला दिल्लीत एक, दोन वर्ष राहिल्यानंतर तो नाशिकमध्ये आला. नंतर तो झरीफ बाबा म्हणून प्रसिद्धीस आला.