
टेंभुर्णी तालुका माढा येथे गणेश उत्सवाचं काम करत असताना मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक ३ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून, मोबीन अजीज आतार (वय १८) असे युवकांचे नाव आहे.
टेंभुर्णी : टेंभुर्णी तालुका माढा येथे गणेश उत्सवाचं काम करत असताना मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक ३ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली असून, मोबीन अजीज आतार (वय १८) असे युवकांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यभागी असलेल्या कसबा पेठ परिसरात अजिक्य भवानी मंडातील कार्यकर्ता असलेला मोबीन आतार हा शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गणेश मंडळांच्या प्रतिष्ठापना केलेल्या गाळ्यामध्ये देखाव्यासाठी घेतलेल्या लाईटची केबल खराब झाली होती. त्याचवेळी मोबीन हा शटर खाली घेत होता यावेळी खराब झालेल्या केबलमधून शटरमध्ये करंट आल्याने त्याचा शॉक लागून झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत पावलेला गणेश भक्त हा पाटील हॉस्पिटलमध्ये काम करत होता. त्याच्या मागे त्याची आई, वडील, मोठी बहीण, आणि छोटा भाऊ हे आहेत. गणपती उत्सवाच्या अगोदर टेंभुर्णी पोलीस स्टेशन व महावितरणने अधिकाऱ्यांमार्फत योग्य ते मार्गदर्शन करून जनजागृती केली होती.