संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कर्नाटकचे मुख्यमंत्री कसे विधान करतात ते पहा आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, आणि भाजपमुळे येथे मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री झाले, ते प्रश्नांवर काहीही बोलत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

    मुंबई :  भाजप करुन सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होणारी अवमानकारक विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाविकास आघाडी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. या सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या निषेध मोर्चाची काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

    17 डिसेंबर रोजी आम्ही सध्याच्या राज्य सरकारच्या विरोधात मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढणार आहोत, आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना हटवण्याच्या मागणीसाठी, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो. राज्याचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे. असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केलं.

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही राज्य सरकारवर सडकून टीका

    दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवत ठाकरे म्हणाले, “कर्नाटक आमचा परिसर, गावं आणि अगदी जाठ, सोलापूर मागत आहे की ते आमचे पंढरपूर विठोबालाही विचारतील का? यातून एक प्रश्न पडतो- महाराष्ट्रात सरकार आहे का? गुजरातप्रमाणेच. निवडणुका झाल्या, काही प्रकल्प तिकडे हलवले, मग कर्नाटक निवडणुकीपूर्वी आमची गावे कर्नाटकला देणार का? असा सवाल त्यांनी केला.

    राज्यपाल कोश्यारींवरही ताशेरे

    तर, 19 नोव्हेंबरला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “तुमची प्रेरणास्थान कोण आहे, असे कोणी विचारले तर तुम्हाला ते शोधण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. ते तुम्हाला महाराष्ट्रातच सापडतील. छत्रपती. शिवाजी महाराज आता जुने मूर्ती बनले आहेत, तुम्ही नवीन शोधू शकता — बाबासाहेब आंबेडकरांपासून ते (केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री) नितीन गडकरीपर्यंत.” या विधानामुळे प्रचंड खळबळ उडाली आणि मराठा संघटनांसह विरोधी पक्षनेत्यांनीही टीका कोश्यांवर टिका केली.