मविआचे ठरलं! अखेर सत्यजित तांबे यांचेही निलंबन… नागपूरमधून सुधाकर अडबालेंना, तर नाशकातून शुभांगी पाटीलांना पाठिंबा; ‘या’ उमेदवारांना…

कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपनेही भूमिका जाहीर करावी असे आवाहन करत सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.

    मुंबई– सध्या राज्यात विधान परिषद पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान,  कॉंग्रेसने नाशिक (Congress Nashik) पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi patil) यांनी उध्दव ठाकरे (Udhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला होता. त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा द्याचा की नाही? तसेच नाशिक व नागपूरमधील कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्याचा याबाबतर आज मविआचा अंतिम निर्णय झाला. दुपारी मविआची दुपारी पत्रकार परिषद पार पडली. महाविकास आघाडीच्या वतिने कॉंग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

    अखेर सत्यजित तांबे यांचेही निलंबन…

    सत्यजित तांबे यांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे नाव घेतले होते, महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केली आहे खाजगी भूमिका कुणाची नाही असेही गोंधळाची स्थिती असलेल्या जागेबद्दल स्पष्ट केले आहे. दरम्यान, यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपनेही भूमिका जाहीर करावी असे आवाहन करत सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.

    हे आहेत उमेदवार…

    नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले.