
मविआच्या या मोर्चाला अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नव्हती, त्यामुळे मविआच्या मोर्चा होणार की नाही, असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्यांच्या मोर्चाला जी काही परवानगी हवी आहे, ती देण्यात आली आहे’, असे सांगितले आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला म्हणजे उद्या महामोर्चा निघणार आहे, दरम्यान, या मोर्चाला दुपारपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळं हा मोर्चा निघणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, यावर महाविकास आघाडीतील नेत आक्रमक झाले असून, मोर्चावर ठाम असल्याचं मविआतील नेत्यांनी म्हटलं आहे. मात्र ताज्या माहितीनुसार या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, मविआच्या महामोर्चाला जशाच तसे उत्तर देण्यासाठी भाजपा देखील पुढे सरसावली आहे. मविआच्या महामोर्चाला भाजपाकडून ‘माफी मागो आंदोलना’ने उत्तर देणार आहे. उद्या भाजपा ‘माफी मागो आंदोलन’ करणार आहे. त्यामुळं उद्या भाजपा विरुद्ध मविआ असा संघर्ष रस्त्यावर दिसणार आहे. मविआच्या या मोर्चाला अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नव्हती, त्यामुळे मविआच्या मोर्चा होणार की नाही, असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्यांच्या मोर्चाला जी काही परवानगी हवी आहे, ती देण्यात आली आहे’, असे सांगितले आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल, तर ते विरोध करतील. फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, यासाठीच केवळ सरकारचा हस्तक्षेप असेल असं फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे भाजपा देखील ‘माफी मागो आंदोलन’ करणार आहे. त्यामुळं उद्या भाजपा विरुद्ध मविआ असा संघर्ष रस्त्यावर दिसणार आहे.