
सीमावाद (Border Dispute) हा ६० वर्षांपासून सुरु आहे. त्यावेळी त्यांचं सरकार होतं हे तिन्ही पक्ष विसरले आहेत. त्यावेळी त्यांनी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आझाद मैदानात मोर्चा (Azad Maidan Morcha) आणा असं सरकारनं त्यांना सांगितलं होतं.
मुंबई : महाविकास आघाडीचा मोर्चा (MVA Morcha) हा शिवसेनेसारखाच (Shivsena) नॅनो (Nano) झाला, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
सीमावाद (Border Dispute) हा ६० वर्षांपासून सुरु आहे. त्यावेळी त्यांचं सरकार होतं हे तिन्ही पक्ष विसरले आहेत. त्यावेळी त्यांनी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आझाद मैदानात मोर्चा (Azad Maidan Morcha) आणा असं सरकारनं त्यांना सांगितलं होतं. मात्र गर्दी नव्हती म्हणून निमुळत्या रस्त्यावर सभा घेतल्याचं फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंची कॅसेट अडकली आहे
उद्धव ठाकरेंच्या भाषणात नवं काही नाही. १० वर्षांपासून ते मुंबई तोडण्याचीच भाषा करीत आहेत. आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून राज्यात आगामी काळात आमचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय.