माझा वनवास संपला, लवकरच राज्यभिषेक होणार; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

मला पण वनवास भोगायची तयारी ठेवावी लागली आहे. मात्र माझा वनवास संपला आहे, लवकरच राज्यभिषेक होणार, असा विजयाचा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

    बीड : मला पण वनवास भोगायची तयारी ठेवावी लागली आहे. मात्र माझा वनवास संपला आहे, लवकरच राज्यभिषेक होणार, असा विजयाचा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्या बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम नवमी कार्यक्रमानिमित्त बोलत होत्या.

    दादेगाव येथे श्रीराम नवमी महोत्सव निमित्त भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेउन फुगडी खेळण्यांच्या आनंद ही लुटला आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी मला तूम्ही गुलाल लावला आहे. त्यामुळे माझा वनवास संपला व लवकरच राज्यभिषेक होणार आहे. रामला पण वनवास भोगावा लागला होता, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.