धक्कादायक, भीमा नदीपात्रातील 7 मृतदेहांचं गूढ उकललं, नात्यातल्या मुलीला मुलानं पळवलं म्हणून उचललं हे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोहन पवार यांना दोन मुले आहेत. त्यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो, तर राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने दोन दिवसापूर्वी त्याच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळवून आणली.  या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले. मोहन पवार आणि त्यांची पत्नी संगीता हे अतिशय स्वाभिमानी म्हणून ओळखले जातात. या दोघांनी 24 तासात अमोलला ही मुलगी परत कर असा लाकडा लावला.

  पाटस – दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटली, त्यात आज सकाळी तीन चिमुरड्यांचे मृतदेह देखील हाती लागले. दीड वर्ष, अडीच वर्ष आणि दोन वर्षाच्या या तीन चिमुरड्यांच्या मृत्यूने फक्त संपूर्ण राज्य हादरले होते, मात्र त्यापेक्षाही त्या सात जणांच्या आत्महत्या मागील कारण समजल्यानंतर उभा महाराष्ट्र थरथरून गेला.

   नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मोहन उत्तम पवार ( वय ४८) त्यांची पत्नी संगिता मोहन पवार (वय ४५), मुलगी राणी शाम फुलवरे (वय २५), व जावई शाम फुलवरे ( वय २८) या चौघ जणांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घातपात की आत्महत्या अशा अंगाने तपास सुरू केला आणि आज दुपारी बेपत्ता असलेल्या तीन चिमुरड्यांचा देखील शोध लागला. राणी आणि श्याम फुलवरे या दाम्पत्याची ही तीन मुले आहेत. त्यांचे मृतदेह आढळल्यानंतर सर्वजण हादरून गेले.

  दोन दिवसापूर्वी त्याच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळवून आणली
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोहन पवार यांना दोन मुले आहेत. त्यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो, तर राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने दोन दिवसापूर्वी त्याच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळवून आणली.  या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले. मोहन पवार आणि त्यांची पत्नी संगीता हे अतिशय स्वाभिमानी म्हणून ओळखले जातात. या दोघांनी 24 तासात अमोलला ही मुलगी परत कर असा लाकडा लावला. यामुळे आपल्या अब्रूचे खोबरे होते आहे, नाहीतर आम्ही सर्वजण विष तरी पितो किंवा जीव तरी देतो अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला.  मात्र अमोल माघारी आला नाही. शेवटी त्यांनी राहुल ला पुण्यात फोन केला आणि सर्व घटना सांगितली, जर अमोल परतला नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले आणि त्यानंतर ते जे गायब झाले, ते कालपर्यंत आढळलेल्या मृतदेहाच्या माध्यमातूनच पुढे आले.

  दोन दिवसापूर्वी त्याच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळवून आणली
  आज सकाळी तीन चिमुरडे पोलिसांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हाती लागले, तेव्हा पाहणाऱ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. आणि जेव्हा ही घटना पोलिसांना समजली तेव्हा पोलीस देखील नि:शब्द झाले. या महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात अनेक आत्महत्या पाहिल्या. काळीज चिरून टाकणारी ही घटना म्हणावी लागेल.

  अर्थात या साऱ्या घटनेमध्ये या तीन चिमुरड्यांचा काय दोष होता अमूल्य मुलगी पळून नेली तर त्याची बहीण राणीचा संसार देखील उध्वस्त होण्याची काय गरज होती हा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होईल परंतु शिक्षणाानुसार सुधारत नाही कधी कधी अनुभवाचे शहाणपण खूप काही सांगून जातं या महाराष्ट्राला या सात जणांनी एक मोठा संदेश दिलेला आहे असे म्हणावे लागेल.