Nagar Panchayat clerk in ACB's net! He was caught accepting a bribe of Rs 5,000

तक्रारदार याला सिसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजूर करुन काढून देण्याच्या कामाकरीता कुरखेडा नगर पंचायतीतील लिपीक देवीदास देशमुख याने ५ हजार ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने याबाबत लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीकडे तक्रार केली.

    गडचिरोली : तक्रारदाराकडून विविध विकास कामांचे बिल मंजूर करून ते काढून देण्याच्या कामाकरीता लाच मागणा-या कुरखेडा नगरपंचायतीतील (Kurkheda Nagar Panchayat) लिपीकास (Clerk) लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने रंगेहाथ पकडल्याची (Caught red handed) कारवाई आज, २८ जून रोजी केली. देवीदास मुखरु देशमुख (Devidas Mukhru Deshmukh) (४५) असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे.

    तक्रारदार याला सिसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजूर करुन काढून देण्याच्या कामाकरीता कुरखेडा नगर पंचायतीतील लिपीक देवीदास देशमुख याने ५ हजार ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने याबाबत लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून संबंधित ठिकाणी सापळा रचला.

    यावेळी लिपीक देवीदास देशमुख याला तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लिपीकावर विविध कलमान्वये कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे. सदर कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थू धोटे, पोना राजेश पदमगिरीवार, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी पार पडली.