धक्कादायक! वेळेत चहा मिळाला नाही म्हणून डॉक्टरचा राग अनावर, अर्ध्यावरच सोडली शस्त्रक्रिया

डॅाक्टरने चहा माग मागवला होता तो वेळेत मिळाला नाही म्हणून संताप आल्याने डॉक्टरन शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आणि तिथून निघून गेले.

    कित्येक जणांच्या दिवसाची सुरुवात चहा (Tea) पिऊन होते. अनेकांना तर चहा पिल्याशिवाय चैनच पडत नाही. कार्यलयातही अनेकांना चहाची हुक्की येते. काही तर असे महाभाग असतात की ते चहाचा घोट घेतल्याशिवाय कामही करत नाही. असाच काहीसा प्रकार नागपुरात घडला आहे. वेळेत चहा दिला नाही म्हणून एक डॅाक्टरनं शस्त्रक्रिया अर्ध्यावरच सोडून निघून गेले. या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    नेमका प्रकार काय?

    शुक्रवारी ३ ऑक्टोबरला नागपुरातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले होते. ऑपरेशनची (operation) सर्व तयारी सुरू झाली. रुग्णांना Anesthesia देखील देण्यात आला होता. डॅाक्टरने चहा माग मागवला होता तो वेळेत मिळाला नाही म्हणून संताप आल्याने डॉक्टरन शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आणि तिथून निघून गेले. या घटनेची वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर तातडीनं दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली.

    जिल्हा परिषदेनं घेतली प्रकरणाची दखल

    हा प्रकार समोर आल्यानतंर, सर्व स्तरापुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर, जिल्हा परिषदेकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणात त्रीसदस्य समितीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

    चौकशीत काय आलं समोर?

    रुग्णांची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर भलावी यांना शुगरचा (Sugar) त्रास असल्यानं त्यांना वेळेवर चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे त्यांना वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्यानं ते आरोग्य केंद्रातून निघून गेल्याचं चौकशीतून समोर आल्याचं डॉ. भलावी यांनी सांगितलं आहे.