नागपूरकरांसाठी महापालिकेने दिली भरघोस सूट; 30 जूनपूर्वी कर भरा अन् 15 टक्के सूट मिळवा

नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त 30 जूनपर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास कर रक्कमेत 15 टक्के सूट (Exemption on Tax) दिली जाणार आहे.

  नागपूर : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त 30 जूनपर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास कर रक्कमेत 15 टक्के सूट (Exemption on Tax) दिली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करून चालू वर्षातील कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

  सदर योजनेबाबत माहिती देताना उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार, 30 जून 2023 पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण 15 टक्के सूट दिल्या जाणार आहे. 15 टक्के सूट अशी आहे की, चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची आगाऊ रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास 10 टक्के सूट आणि ऑनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करुन चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम मनपा निधीत जमा केल्यास 5 टक्के सूट असे एकूण 15 टक्के सूट चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर रकमेत दिली जाणार आहे.

  डिसेंबरपूर्वी भरल्यास 10 टक्के सूट

  31 डिसेंबर 2023 पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण 10 टक्के सूट दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची आगाऊ रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास 5 टक्के आणि जर ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करुन चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास 5 टक्के अशी एकूण 10 टक्के सूट चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर रक्कमेत दिली जाणार आहे.

  थकीत मालमत्तेसाठी सवलत नाही

  थकीत मालमत्ता करासाठी ही सवलत लागू असणार नाही. थकीत मालमत्ता कर रक्कम ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून मन निधीत जमा केल्यास थकीत मालमत्ता रक्कमेवर 5 टक्के सूट लागू होणार नाही. प्रत्येक चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची एकमुस्त रक्कम त्या चालू आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता कर रक्कम जमा करण्याकरिता विहीत केलेल्या दिनांकापूर्वी नागपूर महानगरपालिका निधीत ऑनलाईन पेमेंट सुविधेद्वारे एकमुस्त रक्कम जमा करणारा मालमत्ताधारक संबंधित मालमत्तेच्या कर रक्कमेत सूट मिळण्यास पात्र असेल.