संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

दिवाळी सण आटोपल्यानंतरही प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने बडनेरा मार्गे धावणाऱ्या चार विशेष रेल्वेना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या एकूण 60 फेऱ्या वाढविण्यात आल्याने अंबनगरीतील प्रवाशांची सोय झाली आहे.

    नागपूर : दिवाळी सण आटोपल्यानंतरही प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने बडनेरा मार्गे धावणाऱ्या चार विशेष रेल्वेना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या एकूण 60 फेऱ्या वाढविण्यात आल्याने अंबनगरीतील प्रवाशांची सोय झाली आहे.

    मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. 02139 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर सुपरफास्ट स्पेशल 28 पुणे-अमरावती-पुणे विशेषच्या 18 फेऱ्या वाढल्या. पुणे व अमरावती या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या अप व डाऊन प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

    1 डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेल्या 09439 पुणे- अमरावती विशेष रेल्वेची मुदत 31 डिसेंबरपर्यंत, तर 2 डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेल्या 01440 अमरावती – पुणे विशेष रेल्वेची मुदत 1 जानेवारी 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 02140 नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष सुपरफास्ट स्पेशल 30 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा प्रत्येकी 11 फेऱ्या वाढल्या आहेत.

    गाडी क्र. 02144 नागपूर-पुणे विशेष भाडे वातानुकूलित विशेषला 28 डिसेंबरपर्यंत, तर 021143 पुणे-नागपूर विशेष भाडे वातानुकूलित विशेषला 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्र. 01127 मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्लारशा विशेष भाडे सुपरफास्ट स्पेशलची मुदत 26 डिसेंबर, तर 01128 बल्लारशा-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष भाडे सुपरफास्ट स्पेशलची मुदत 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.