नागपूर रत्नागिरी भुयारी मार्गाला बासणात! निवेदनला अधिकारीने दाखवली केराची टोपली

हेरले (ता. हातकणंगले) या गावातून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एकूण बाराशे एकर शेती आहे. तिथे रोज शेतकरी ये -जा करत असतात. पण या रत्नागिरी नागपूर महामार्गाला कोणताही भुयारी मार्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी अनेकदा निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेली दिसून येत आहे.

    शिरोली : हेरले (ता. हातकणंगले) या गावातून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एकूण बाराशे एकर शेती आहे. तिथे रोज शेतकरी ये -जा करत असतात. पण या रत्नागिरी नागपूर महामार्गाला कोणताही भुयारी मार्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी अनेकदा निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेली दिसून येत आहे.
    रस्त्यालगत झाडीटेकमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती होत असल्याने हेरले ग्रामपंचायतच्या वतीने तिकडे पाईप लाईनद्वारा पाणीपुरवठा केला जात होता. पण तो देखील या रस्त्याच्या कामामुळे नादुरुस्त आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. यासाठी आज सर्व गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. कामकाज बंद पाडल्याचे समजतात अधिकारी वैभव पाटील, जाधव, श्रीधर, एप्पल नायडू अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. जो पर्यंत भुयारी मार्ग होत नाही, तोपर्यंत येथे काम होऊ देणार नाही असे शेतकऱ्यांनी इशारा देत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
    यावेळी हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे, सदस्य मनोज पाटील, अमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड, बालेचाद जमादार, कोळेकर, महेश जाधव, बाबासाहेब रुईकर, आनंदा हराळे, तानाजी कोळेकर, उदय कोळेकर, देवाप्पा हराळे, भगवान कोळेकर. भुजापा कोळेकर, सचिन हक्के, रंजीत कोळेकर, काशिनाथ कोळेकर, शमु मुलांनी, जावेद मुलानी, समीर पेंढारी, रशीद मुलानी, मोहसीन जमादार, राजगोंड पाटील, सतीश परमाज, आदींसह हेरले गावातील महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.