
या ९२७ .७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पा मधून ५७२ आणि १९०० ले-आउट यासाठी असणार आहे. तर, नवीन अभिन्यासांमध्ये मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी ६५ कोटी रुपये करण्यात येणार आहे. तर, यात महाराष्ट्र गुंठेवारी विकास अंतर्गत ९५ कोटी येणे अपेक्षित असून त्यावरच या वस्त्यांचा विकास अवलंबून राहणार असणार आहे.
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने ९२७ .७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आज हा अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी प्रन्यासचे आमदार विकास ठाकरे, संदीप ईटकेलवार, नगररचना विभागाचे सहसंचालक सुप्रिया थुल, महाव्यवस्थापक निशिकांत सुके, अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या ९२७ .७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पा मधून ५७२ आणि १९०० ले-आउट यासाठी असणार आहे. तर, नवीन अभिन्यासांमध्ये मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी ६५ कोटी रुपये करण्यात येणार आहे. तर, यात महाराष्ट्र गुंठेवारी विकास अंतर्गत ९५ कोटी येणे अपेक्षित असून त्यावरच या वस्त्यांचा विकास अवलंबून राहणार असणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या उत्पनातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ९६ लाख रुपये खर्च होणार आहे. तर, सिवेज ट्रीटमेंट प्लांट व मेन सिवर सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी १५ कोटी, खेळाच्या मैदानाचा एकात्मिक विकासासाठी १० कोटी, नवीन रस्ते बांधणीसाठी ५ कोटी खर्च करण्याचे सुधार प्रन्यासने प्रस्तावित केले आहे.
प्रन्यासला पुढच्या आर्थिक वर्षात घरबांधणीतून १५० कोटी तर, भूखंड व दुकानाच्या भाडेपट्ट्यांमधून ३५ कोटी येणे अपेक्षित आहे. या निधीतून विकासाची विविध कामे व रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १०५ कोटी, प्रन्यासचे दोन विभागीय कार्यालयाच्या इमारती बांधकामासाठी १५ कोटी, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर वस्ती सुधार योजना, आमदार निधी, खासदार निधी, मौजा मानेवाडा येथील ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटर, महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान महाअभियान यासाठी ४१२ कोटी ७३ लाखांचे प्रावधान केले आहे. जन सुविधा केंद्रांकरिता ३ कोटी, आशीर्वाद नगर, कळमना येथील मार्केटचा विकास करण्याकरिता पाच कोटी रुपये खर्च करण्यात येण्याचे प्रस्तावित आहे.