
या प्रकरणी सर्व आरोपी गेली पाच वर्ष तुरुंगात होते. कालंतराने त्यातील सह आरोपींना जामीन मंजुर झाला.
रवींद्र माने-वसई : हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली गेली ५ वर्ष अटकेत असलेल्या सनातन साधक वैभव राऊत ला उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. १० ऑगस्ट २०१८ ला वैभव राऊतच्या सोपारा गाव-भंडार आळीतील घरावर एटीएसने छापा मारून अटक केली होती. या छाप्यात २० जिवंत गावठी बाॅम्ब, जिलेटीनच्या दोन कांड्या, ४ इलेक्ट्रिक डिटोनेटर्स, २० नाॅन इलेक्ट्रीक डिटोनेटर्स, पाॅयझन लिहीलेल्या १ लिटरच्या दोन बाटल्या आणि वेगवेगळ्या स्फोटकांची पाकिटे सापडल्याची माहिती एटीएस कडून देण्यात आली होती.
त्यानंतर या प्रकरणी कोल्हापुर, पुणे, सातारा परिसरातून सुधंन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांघरकर, अविनाश पवार यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींवर हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्यामुळे देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आल्याचा ठपका एटीएसने ठेवला होता. या प्रकरणी सर्व आरोपी गेली पाच वर्ष तुरुंगात होते. कालंतराने त्यातील सह आरोपींना जामीन मंजुर झाला. त्यामुळे वैभव राऊतने ही जानेवारी २०२३ मध्ये उच्च न्या यालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्याने आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती. त्यावर न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली खंड पिठाने हा अर्ज मंजुर केला.