
भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे या नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी समर्थन केलं आहे.
कल्याण : भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे या नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचं भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी समर्थन केलं आहे. याच वेळी त्यांनी उल्हासनगर महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधत सडेतोड तोड टीका केली. उल्हासनगर महापालिकेत अनधिकृत बांधकामे, पाणी चोरी, महापालिके क्षेत्रातील होर्डिंगच्या टॅक्स पैसे लाटणे, एकाच विकास कामांसाठी चार चार निधी वापरणे असा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे.
भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे या नाना पाटेकर यांच्या वक्तव्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी समर्थन केलं आहे. नाना पाटेकर यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेच्या कार्यपद्धतीला लक्ष केलंय. नाना पाटेकर यांनी भ्रष्टाचाराला ठेचून काढलं पाहिजे असे सांगितले ही गोष्ट खरी असल्याचे आमदार गायकवाड पुढे बोलताना म्हणाले नाना यांनी बोलले आहे हाताचे पाचे बोटं सारखे नाहीत असेही ते बोलले होते मात्र उल्हासनगर महापालिकेत सर्व अधिकारी हाताच्या पाचही बोटांसारखी आहेत. एकच कामासाठी आमदार निधी खासदार निधी महापालिकेच्या निधी राज्य शासनाचा निधी, असे चार निधी वापरले गेले आहेत.
अनधिकृत बांधकामांचा भ्रष्टाचार, पाणी चोरून विकणे, मेन लाईन वरून अनधिकृत कनेक्शन देऊन त्यांच्याकडून पैसे वसुली करणे, महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेले होर्डिंगचे पैसे खाल्ले जातात, याबद्दल माहिती मागितली तर दिली जात नाही. नाना पाटेकर यांनी जे सांगितलं हे महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाना पाटेकर यांचा आदर करतो आणि त्यांना दुजोरा करण्यासाठी ही माहिती देतोय जो भ्रष्टाचार होतोय तो भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे असा आमदार गायकवाड यांनी सांगितलं.