
महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार ‘महा’संकटात सापडले आहे. अशातच आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे(Nana Patole claims that Ajit Pawar is responsible for Eknath Shinde's rebellion).
महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार ‘महा’संकटात सापडले आहे. अशातच आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे(Nana Patole claims that Ajit Pawar is responsible for Eknath Shinde’s rebellion).
सरकार जनतेसाठी काम करेल हा विचार होता. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचं समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे या तक्रारी येत होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होत होता. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला निधी मिळत नव्हता. हे सरकार जनतेसाठी होते एका पक्षासाठी नव्हते. त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोध स्वाभाविक होता., असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.