शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे – नाना पटोले

राज्यातील दोन लोकांचे असंवैधानिक सरकार स्वतःच्या मस्तीत असून अद्याप शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई नाही अशी टिका त्यांनी यावेळी केली. तर, शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचंही ते म्हणाले.

    चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. राजुरा तालुक्यातील शेतशिवारांना स्वतः भेटी देत परिस्थिती पाहिली. राज्यामध्ये साडेदहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची दिली माहिती त्यांनी यावेळी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या संदर्भात बोलताना सत्तेच्या उन्मादात असलेल्या या सरकारला लोकशाही पद्धतीने घरी पाठवू, आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले.

    दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यास विशेष भेट दिली आहे. तसेच या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आढावा बैठका घेत संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते सर्व निर्देश दिले.