काँग्रेसला दुष्ट लावणाऱ्यांचा वचपा काढू; नाना पटोले, विश्वजीत कदम यांचा इशारा

एकेकाळी जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी होती, आम्ही ही गटबाजी संपवली होती आणि काँग्रेस एकसंध केली. मात्र, काहींची याला दुष्ट लागली, ही दुष्ट लवकरच आम्ही काढू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मात्र दोघांनीही नेमकी कोणाची दृष्ट लागलीय जे सांगणे टाळले.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एकेकाळी जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी होती. आम्ही ही गटबाजी संपवली होती आणि काँग्रेस एकसंध केली. मात्र, काहींची याला दुष्ट लागली. ही दुष्ट लवकरच आम्ही काढू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

  सांगलीत भावे नाट्यगृह परिसरात आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजीत कदम, लोकसभा निरीक्षक रमेश बागवे, जे.के.जाधव, सिकंदर जमादार यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  पटोले म्हणाले, ” नाना पटोले म्हणाले, सांगलीची जागा ही काँग्रेसची हक्काची जागा आहे, सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे, या भावनांशी मी सहमत आहे, या जागेसाठी दिल्ली पर्यंत चर्चा झाली, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, मात्र या ठिकाणी राजकारण झाले, त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आपल्याला ही जागा सोडावी लागली, आता महविकास आघाडी धर्म पाळून आपल्याला भाजपला थांबवावे लागेल. एकही जागा गमावणे आपल्या देशाला परवडणारे नाही, भाजप कोणताही पातळीवर जाऊ शकते, महागाई वाढेल, संविधान अडचणीत आणतील प्रसंगी यापुढे निवडणुका देखील न होण्याचा धोका आहे, म्हणून आता काँग्रेसच्या हाताने सेनेची मशाल पेटवा”, अशी विनंती त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केली.

  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी काहीच अडचण नव्हती, मात्र राजकारण झालं आणि ही जागा आम्ही दिल्ली पर्यंत प्रयत्न करून देखील मिळाली नाही, आता आपल्याला प्रदेशाध्य जो निर्णय सांगतील तो आपण पाळूया, असेही ते यावेळी म्हणाले.

  काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ

  काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगलीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली, मात्र तरी देखील विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते, त्यातच नेत्यांची भाषणे सुरू असताना कार्यकर्त्यानी आमच्या भावना समजून घ्या म्हणून गोंधळ घातला, अखेर डॉ.विश्वजीत कदम यांना मंचावरून खाली येऊन समजूत घालावी लागली.

  विश्वजीत कदमांनी विचारला जाब

  माजी मंत्री विश्वजीत कदम यावेळी बोलताना आक्रमकपणे म्हणाले, ” डबल महाराष्ट्र केसरी यांनी प्रवेश केला, त्यावेळी आम्हाला शंका आलेली होती, काही तरी घडतंय असं वाटलं होतं, कोण काय करत होतं, त्यावेळी तुम्ही काय करत होता ? ” असा सवाल डॉ.विश्वजीत कदम यांनी मंचावरून पक्ष श्रेष्टीना विचारला.