Angry BJP agitates against Congress state president Nana Patole

“मुख्यमंत्री करी दिल्लीवारी लेक झाला कारभारी, दुकान चालवायची रीत न्यारी लोकशाहीची थट्टा सारी.” असं पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    मुंबई – राज्याती एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कच्या जागेसाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका फोटोमुळे नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.

    “मुख्यमंत्री करी दिल्लीवारी लेक झाला कारभारी, दुकान चालवायची रीत न्यारी लोकशाहीची थट्टा सारी.” असं पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    शिवाय, विरोधकांना देखील मुख्यमंत्री शिंदेवर टीका करायला चांगली संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण, पाठीमागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असं लिहिलेला फलक आणि त्याच्या समोरील खुर्चीत चक्क श्रीकांत शिंदे बसल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील निशाणा साधला आहे.