काँग्रेसमधील बंडखोरीची माहिती पक्षश्रेष्ठीना देणार, महाविकास आघाडीत राहायचे की नाही हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील – नाना पटोले

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात. यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, आज शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, बैठकांचे सत्र सुरु आहे. तर काँग्रेसमधील बंडखोरीची माहिती श्रेष्ठीना देणार असल्याचं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हटले आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी केल्याचे पाहयला मिळाले. दरम्यान, भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात. यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, आज शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, बैठकांचे सत्र सुरु आहे. तर काँग्रेसमधील बंडखोरीची माहिती श्रेष्ठीना देणार असल्याचं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हटले आहे.

    तसेच आज काँग्रेसची मुंबईत बैठक होत असून, महाविकास आघाडीत राहायचे की नाही याबाबत मुंबईत नेत्यांशी चर्चा करून प्रतिक्रिया देईन अंस नाना पटोलेंनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीत राहयचं की नाही हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत, सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 13 आमदार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहाही आमदार पोहोचलेले आहेत, त्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.