
भाजपचे राज्य, केंद्रातील मंत्री नागपुरात राज्यात, सरकार इथून चालवल्याचा दावा करतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे. अनेक वर्षांपासून मनपा आणि इतर ठिकाणी सत्तेत बसलेले अपयशी ठरले आहेत.
नाना पटोले यांची पत्रकार परिषद : आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पाहणी केली. त्यांनतर नाना पटोले यांनी सरकारला चांगलंच धारेवर आणलं आहे. नागपूरमध्ये पावसामुळे नागरिक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर मधील लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे लोकांचे अमाप नुकसान झाले आहे. हे सरकारचे अपयश आहे. आपत्ती व्यवस्थापन शिल्लक राहिले नाही. भाजपचे राज्य, केंद्रातील मंत्री नागपुरात राज्यात, सरकार इथून चालवल्याचा दावा करतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे. अनेक वर्षांपासून मनपा आणि इतर ठिकाणी सत्तेत बसलेले अपयशी ठरले आहेत. भाजपने नागपूरकरांची माफी मागावी असे नाना पटोले म्हणाले.
पुढे ते म्हणाले, बावनकुळे यांची विद्वत्ता समोर आली आहे. त्यांनी पत्रकारांना चहा पाजा आणि धाब्यावर न्या असे म्हंटले. भाजपने पत्रकारांचे अवमूल्यन केले आहे. काँग्रेसची मागणी आहे, लवकर पंचनामे करून खऱ्या नुकसानाची मदत करावी. फक्त दहा हजार, पन्नास हजार मदत करून चालणार नाही. झालेल्या नुकसान भरपाईची जबाबदारी भाजपची आहे. अंबाझरी तलावाजवळ विवेकानंद स्मारकाच्या स्वरूपात नियमबाह्य बांधकाम केले आहे. त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले पाहिजे. अंबाझरी तलाव कधीही फुटू शकतो. त्यामुळे आता स्ट्रक्चरल ऑडिट आणि सोशल ऑडिट ही झाले पाहिजे. नागपुरातील हिरवळ संपवून अनियोजित विकास केले. नागपुरात ड्रेनेज सिस्टम नाही, त्याचा हा परिणाम आहे असे नाना पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाचे समर्थन केले. मात्र, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जातीनिहाय गणनेच्या मागणीचा विरोध का केला जात आहे? भाजपने याच उत्तर द्याव. भाजपचा हा जूमला आहे. Shedule 10 प्रमाणे ही सुनावणी विशिष्ट काळात संपायला हवी होती. मात्र, भाजप सरकारचा दबाव, केंद्रीय यंत्रणांचा दबाव यामुळे हे होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचून निर्देश दिले. झिरवळ यांना ही अध्यक्षांसारखे अधिकार होते. तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा पत्र दिले होते. जेव्हा केव्हा अध्यक्षांचा निकाल येईल तेव्हा लोकशाहीचे वाटोळे केल्याचे पाप समोर येईल. कोण कोणाला भेटतात? याच्याशी आमचे सोयरसुतक नाही. शरद पवार यांचे पक्ष वेगळे पक्ष आहे. ते कोणाला भेटतात? याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. जे भाजप विरोधात लढायला तयार आहे, ते आमच्या सोबत आहे, हे आम्ही आधीच सांगितले आहे. नागपूरकरांना भाजपच्या सत्तेतील लोकांवर जे विश्वास होते, ते आता नाही, कारण या नेत्यांनी लोकांचे विश्वासघात केले आहे असे नाना पटोले यांनी सांगितले.