हरयाणात पकडलेल्या बब्बर खालसा अतिरेक्यांचे नांदेड कनेक्शन उघडकीस आल्याने खळबळ; पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

हरयाणात पकडलेल्या बब्बर खालसा अतिरेक्यांचे नांदेड कनेक्शन उघड झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. यापूर्वी नांदेडला शस्त्रसाठा पुरवठा झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे(Nanded connection of Babbar Khalsa militants captured in Haryana).

    नांदेड : हरयाणात पकडलेल्या बब्बर खालसा अतिरेक्यांचे नांदेड कनेक्शन उघड झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. यापूर्वी नांदेडला शस्त्रसाठा पुरवठा झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे(Nanded connection of Babbar Khalsa militants captured in Haryana).

    पाकिस्तानात असलेल्या हरविंदर सिंग रिंदा याचे नांदेडमध्ये 50 सदस्य असल्याची माहिती येथील पोलिस अधीक्षकांनी दिली होती. तेव्हापासून पोलिसांनी तीन पथकांद्वारे रिंदाच्या नांदेड येथील शेतात पाहणी केली. तसेच त्याच्या संपर्कातील सदस्याच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीत काही तलवारी मिळाल्याची माहिती मिळत हाती आली आहे तसेच पोलिस साथीदारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे समजते. हरयाणात पकडलेल्या चार सदस्यांच्या चौकशीसाठी नांदेड पोलिसांचे एक पथक हरयाणाकडे रवाना झाले आहे.

    दरम्यान एटीएसने देखील या प्रकरणात आता चौकशी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे.गुरुवारी हरयाणा राज्यातील करनाल पोलिसांनी चार दहशतवाद्यांना पकडल्यानंतर ते शस्त्रसाठा घेऊन नांदेडमध्ये येत असल्याची माहिती उघड झाली होती. या दहशतवाद्यांचा महाराष्ट्रात घातपात करण्याचा कट होता, असा संशय आहे.