
नंदुरबार च्या मानाच्या दादा गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष भक्त सहभाग घेऊन नाचण्याच्या आनंद घेत आहेत.
खासदार डॉ. हिना गावित : आज १० दिवसांच्या गणरायाचे विसर्जन मिरवणूक होणार आहे. अनंत चतुर्थी निमित्त सर्वत्र आज उत्साहाचे वातावरण असणार आहे. राज्यामध्ये अनेक मोठ्या मंडळांचे त्याचबरोबर मुंबईमधील नामवंत मंडळांतील गणरायांच्या विसर्जनाच्या मिरवणूका निघणार आहे. आज मुबंईमध्ये सर्वत्र गर्दीचे वातावरण पाहायला मिळेल. आज नंदुरबार जिल्ह्यातील २२८ गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक काढत आहे. नंदुरबार येथील श्री मानाच्या दादा गणपतीची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून या विसर्जन मिरवणुकीत महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
मानाच्या प्रथम दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावित यादेखील सहभागी झाल्या त्यांनाही नाचण्याच्या मोह आवरता आला नसून त्यांनीही विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या आनंद घेतला .तसेच खा. हीना गावित यांनी मानाचा दादा गणपतीच्या रथ ओढला. नंदुरबार च्या मानाच्या दादा गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष भक्त सहभाग घेऊन नाचण्याच्या आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आज मुंबईमधील चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजाचे विसर्जन मिरवणूक निघणार आहे.