हिंदुत्वाशी गद्दारी केलीत म्हणून…, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा असे आहेत, पक्षावाढीसाठी कधी संघर्ष केला का? असा सवाल सुद्धा राणेंनी उपस्थित केला. अमित शहांचे दौरे तुम्हाला का झोंबले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली. आम्हाला अस्मान दाखवू कोणाच्या जीवावर म्हणता आहात, शिवसेनेच्या जन्म झाला तेव्हा तुम्ही फक्त सहा वर्षाचे होता.

    मुंबई : बुधवारी मुंबईत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) गटप्रमुखांचा मेळावा घेत भाजपा (BJP) व शिंदे गटावर (Shinde group) जोरदार प्रहार केला. यानंतर सत्ताधाऱ्यांकडून भाजप व शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर टिका केली जात आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे. (Narayan Rane press conference)

    दरम्यान, उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा असे आहेत, पक्षावाढीसाठी कधी संघर्ष केला का? असा सवाल सुद्धा राणेंनी उपस्थित केला. अमित शहांचे दौरे तुम्हाला का झोंबले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली. आम्हाला अस्मान दाखवू कोणाच्या जीवावर म्हणता आहात, शिवसेनेच्या जन्म झाला तेव्हा तुम्ही फक्त सहा वर्षाचे होता. दरम्यान, आजची पत्रकार परिषद फक्त उद्धव ठाकरेंसाठी आहे, असंही राणेंनी म्हटलं. आता गटप्रमुखांची यांना आठवण झाली का, पहिले मंत्री आमदार खासदारांची बैठक घ्यायचे. शाहांना आव्हान देण्याची ठाकरेंची औलादा आहे का? नैराश्यतून कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण होतं, हिंदुत्वाशी गद्दारी करुन तुम्ही राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेला. व सरकार स्थापन केलं. यामुळं तुमच्यावर ही वेळ आली असा घणाघात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.