
हे संगळं राजाकारण पाहिल्यानंतर जसा सत्या त्याचे एपिसोड्स असतात तसं झालं आहे. २००६ साली मी पक्ष स्थापन केला तेव्हा शिवसेना सोडताना म्हटलं होतं ही चार टाळकी शिवसेना खड्ड्यात घालणार. हे शिवधनुष्य आहे. जे कोणालाही झेपणार नाही. एकाला झेपलं नाही.
मुंबई : सतत महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. तेव्हा मला दाबण्याचा प्रयत्न होतो हे मला माहिती होतं. पापाचा वाटेकरी व्हायचं नसल्यानं पक्ष सोडला. माझे होर्डिंग्जवर फोटो टाकू नयेत असं सांगितलं होतं. मी शिवसेनेतून कधी बाहेर पडतोय याची वाट पाहात होते. नारायण राणेंना (Narayan Rane) शिवसेना सोडायची नव्हती (Not Quit Shivsena) पण नारायण राणेंना बाहेर पडू देऊ नका असं बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) सांगितलं होतं. राणे जात असताना त्यांना थांबवू नका असं बाळासाहेबांनी सांगितलं असं राज ठाकरे शिवतीर्थावर आयोजित पाडावा मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित सभेत म्हणाले.
हे संगळं राजाकारण पाहिल्यानंतर जसा सत्या त्याचे एपिसोड्स असतात तसं झालं आहे. २००६ साली मी पक्ष स्थापन केला तेव्हा शिवसेना सोडताना म्हटलं होतं ही चार टाळकी शिवसेना खड्ड्यात घालणार. हे शिवधनुष्य आहे. जे कोणालाही झेपणार नाही. एकाला झेपलं नाही. आता दुसऱ्याला किती झेपतं हे पाहायचंय असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे त्यावर माझं तर मत आहे एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. ज्यांच्या तोंडात शेण घालायचं आहे त्यांच्या तोंडात जनता शेण घालेल, ज्याला सत्तेत बसवायचं त्याला बसवेल. लहानपणापासून जे पाहत आलो त्यातून हेच जाणवतं की महाराष्ट्रातील राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.