अखेर नारायण राणेंना महायुतीकडून उमेदवारी जाहीर; आता राणे विरूद्ध राऊत यांच्यात होणार लढत

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली होती. पण महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला नव्हता.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली होती. पण महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला नव्हता. पण आता महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी जाहीर करण्यात आली.

    महायुतीकडून सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह इतर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली नव्हती. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण रत्नागिरी-सिंधुदुर्गासाठी उमेदवार जाहीर झाला नव्हता. त्यात महायुतीकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेदेखील इच्छुक होते. मात्र, आता त्यांना उमेदवारी जाहीर न होता नारायण राणे यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आले.

    दरम्यान, नारायण राणे यांना ही उमेदवारी जाहीर झाल्याने आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांच्यात लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.