राणेंचा हल्लाबोल; संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत

शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही, अशा शब्दांत नारायण राणेंनी हल्लाबोल केला आहे. गोव्यावरून सिंधुदुर्गात येत असताना त्यांनी काही वेळ थांबून सावंतवाडीतील पत्रकारांशी संवाद साधला.

    सावंतवाडी : राज्यातील राजकीय घडामोडींनंतर (Political Crisis) सातत्याने शिवसेना विरुद्ध शिंदे सरकार-भाजप (Shivsena Vs Shinde Group-BJP) यांच्यात जुंपली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सातत्याने शिंदे सरकार आणि भाजपवर टीका करताना दिसतात. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उडी घेतली असून खासदार संजय राऊत यांच्यावरक हल्लाबोल केला आहे.

    शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही, अशा शब्दांत नारायण राणेंनी हल्लाबोल केला आहे. गोव्यावरून सिंधुदुर्गात येत असताना त्यांनी काही वेळ थांबून सावंतवाडीतील पत्रकारांशी संवाद साधला.

    आपण ज्योतिषी असून हे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच, संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत, काहीतरी केले म्हणूनच गुन्हा दाखल झाला, असाही प्रहार त्यांनी केला.