“नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, एअर इंडियाचा मॅनेजर महिन्याला लाखो रुपये…”, राणेंच्या गौप्यस्फोटामुळं ठाकरे अडचणीत?

नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यात विस्तव देखील जात नाही. ऐकमेकांवर टीका करताना सतत दिसताहेत. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी एक वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं सर्वाच्यात भुवया उंचावल्या असून, यामुळं उदधव ठाकरेंची चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

    मुंबई – नारायण राणेंनी (Narayan Rane) जेव्हापासून शिवसेना सोडली आहे, तेव्हापासून शिवसैनिक, उद्धव ठाकरे व नारायण राणे किंवा राणे कुटूंबिय यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना अनेकवेळा सर्वांनी पाहिले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळं एकिकडे राणे व दुसरीकडे शिंदे गट (Shinde group) असे दोघेही ठाकरे गटावर तुटून पडताहेत. नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यात विस्तव देखील जात नाही. ऐकमेकांवर टीका करताना सतत दिसताहेत. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी एक वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं सर्वाच्यात भुवया उंचावल्या असून, यामुळं उदधव ठाकरेंची चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. (Narayan Rane’s sensational allegation on Uddhav Thackeray, Air India manager lakhs of rupees per month…”, Thackeray in trouble due to Rane’s secret explosion)

    १४० मराठी कामगार उद्धव ठाकरेंमुळं बेकार…

    दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंमुळं १४० मराठी कामगार बेकार झाले आहेत. सहारा हॉटेलमध्ये मालक बदलल्यानंतर नवीन मालकांने या कामगारांना कामावरुन काढून टाकले. याच्या बदल्यात एका कामगारांमागे लाखो रुपये दिले. असे एकूण ७ कोटी रुपये या सहारा हॉटेल मालकांने उद्धव ठाकरेंना दिले. त्यामुळं १४० मराठी कामगारांवर बेकारीचे कुऱ्हाड आली. असा गंभीर आरोप व खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला आहे.

    उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख…?

    तर पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा. तसेच, सहारांकडून उद्धव ठाकरेंनी ७ कोटी रूपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे. याचा मी साक्षीदार आहे. याची चौकशी करा, यावर मी बोलायला तयार आहे, असं राणे म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्या या गंभीर आरोपानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून या आरोपाला काय प्रतिउत्तर येते हे पाहावे लागेल.