
दिनो मोरियाचा आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे? हे बाहेर यायला पाहीजे. आदित्य ठाकरेंना घटनास्थळी काही लोकांनी पाहिलंय. ते आता समोर येतील, असा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तसेच मी पहिल्यापासून म्हणतोय दिशा सालियानची हत्या झालीय. हा खून आहे यावर मी ठाम आहे.
मुंबई: हिवाळी अधिवेशनात सामान्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी लोकप्रतिनिधी ऐकमेकांवर चिखलफेक करताहेत. अधिवशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, आता सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण सत्ताधाऱ्यांनी लावून धरले आहे. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्टची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. यावर विरोधक मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा बाहेर काढला म्हणून जे प्रकरण संपलेच आहे, ते प्रकरण सत्ताधारी उकरुन काढताहेत असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर लोकसभेत खासदार राहुल शेवाळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होण्याची मागणी केली. यानंतर याचे पडसाद राज्यातील अधिवेशनात उमटताना दिसताहेत.
दरम्यान, सुशांतसिगं राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन काल सभागृहात गदारोळ, गोंधळ होत कामकाज तहकूब करण्यात आले. तर या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, एका ३२ वर्षीय तरुणाने सरकारला घाबरुन सोडले आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी टिका करताना, स्वत:ला टायगर समजता मग एका तरुणीचे हत्या का केली? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, दिनो मोरियाचा आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे? हे बाहेर यायला पाहीजे. आदित्य ठाकरेंना घटनास्थळी काही लोकांनी पाहिलंय. ते आता समोर येतील, असा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तसेच मी पहिल्यापासून म्हणतोय दिशा सालियानची हत्या झालीय. हा खून आहे यावर मी ठाम आहे. मागील सरकारनं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. ही आत्महत्या नसून खून आहे, हे मुख्यमंत्र्यांना पटल्यामुळे चौकशी सुरू केलीय असं नारायण राणे म्हणाले.
काय आहेत राहुल शेवाळेंचे आरोप?
सुशांतसिंग तसेच दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राणे कुटुंबानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलंय. रिया चक्रवतीच्या मोबाईलमध्ये AU असा उल्लेख आढळला आहे, म्हणजे आदित्य उद्धव त्यामुळं याचा तपास व्हावा, अशी मागणी लोकसभत शेवाळेंनी केली आहे.
शेवाळेंच्या आरोपानंतर काय म्हणाले आदित्य?
दरम्यान, राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार करताना, शेवाळेंवर टिका केली आहे, तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला त्या घाणीत पडायचे नाही, सीबीआयने तपास केला आहे. पोलीस पुन्हा तपास करतील, पण ज्याचे लग्न व संसार आम्ही वाचवला ते आमच्यावर आरोप करताहेत. यात मी पडणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.