Bhaskar will chop Jadhav, I will not leave anyone like that, Narayan Rane

Narayan Rane on Bhaskar Jadhav : भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. "कोण तरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही.

    Narayan Rane on Bhaskar Jadhav : भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. “कोण तरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असे नारायण राणे म्हणाले आहेत. सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात देखील नारायण राणेंनी त्यांच्या बेधडक वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे.
    ‘बाळासाहेबांना सांगून मी भास्कर जाधवांना विधानसभेचे तिकिट दिले’
    नारायण राणे म्हणाले, ज्या भास्कर जाधवला बाळासाहेब ठाकरे यांना सांगून आमदारकीचे तिकीट दिलं. तसेच निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले त्याचा भास्कर जाधवला विसर पडला आहे. माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. माझ्याकडे आला प्रचाराला पैसे नाहीत. विचारले किती लागतील? म्हणाला 10 लाख लागतील. एकदा दहा आणि एकदा 15 लाख घेऊन गेला. परत देण्याचीही त्याची दानत नाही, असा दावाही नारायण राणे यांनी केला.
    काय म्हणाले होते भास्कर जाधव?
    उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पार पडलेल्या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर जहरी टीका केली होती. भास्कर जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो, असे जाधव म्हणाल होते. शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचा नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.