नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरे फुसका बार, अडीच वर्षात दोनच…

लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे फुसका बार, दहशताद्यांना सुपारी देणारा, कमिशन खाणारा, हिंदुत्वाशी गद्दारी करणारा,असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच शरद पवार यांनी शिवसेना संपवली,असे देखील नारायण राणे म्हणाले.

    उद्धव ठाकरे यांना काय कळतंय, उद्धव ठाकरे म्हणजे फुसका बार.अडीच वर्षांमध्ये दोन दिवस मंत्रायलयात गेले. मातोश्रीच्या बाहेर कधी पडले नाही. जो माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही, त्यांनी लोकांच्या हिताचं कोणतं काम केलं, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. विद्यमान खासदारविनायक राऊत हे पाच वर्षात ५७ टक्के खासदार निधी खर्च करू शकले नाहीत,असे म्हणत त्यांनी विनायक राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.

    रत्नागिरी सिंधुदुर्गमधून अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या उमेदवारीसाठी नारायण राणे इच्छुक आहेत. त्यामुळे आता नारायण राणेंनी महाविकास आघाडीला जवळ केले आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पाच किलो कुणाला धान्य दिलं का? उलट केंद्र सरकारकडून कोरोना काळात औषधासाठी पैसे आले त्यात १५ टक्के कमिशन काढून खाल्लं, आता त्याची चौकशी सुरू आहे. याला जवळ घेऊ नये, मी नाय सोडणार,असे नारायण राणे म्हणाले.

    गद्दरांचे मालक सध्या महाराष्ट्रात फिरतायत, अशी टीका काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली होती. मात्र त्यांनी केलेल्या या टीकेवर नारायण राणेंनी प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना चांगलं बोलता येत नाही. राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले, मात्र उद्धव ठाकरे यांच्यासारखी भाषा कोणी केली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व, मराठी माणूस यांच्याशी गद्दारी केव्हाही केली नाही, असे नारायण राणे म्हणाले.