भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले…

रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

    सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

    नारायण राणे यांची थेट लढत ही ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. दरम्यान, अडीच लाख मतांनी आपला विजय होईल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.