दंगलीविषयी बोलत असतील, तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करावी; नारायणे राणेंचा प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल

Pune : मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर सरकारवर टीका करीत निशाणा साधत आहेत. तोच धागा पकडत केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) जोरदार हल्लाबोल चढवत, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.

  पुणे : राज्यात दंगली होऊ शकतात, असे म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. ते पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते.

  FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे

  प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा.

  दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी

  नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सावरासावरव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले.

  दंगलीबाबत बोलणाऱ्यांची चौकशी करा
  प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही असो, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्याची पोलिसांनी दखल घ्यावी, त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी.दंगल रोखण्यासाठी अटक देखील करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून, त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.

  भुजबळांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी कटिबद्ध नाही
  आम्ही इथे जनतेच्या उपक्रमासाठी जमलेलो आहेत. मी छगन भुजबळांबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर उत्तर द्यायला कटिबद्ध नाही, असं नारायण राणे म्हणाले.

  जरांगे वयाने लहान, त्यांनी अभ्यास करावा
  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा. ते अजून वयाने लहान आहेत. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असा दावा नारायण राणे म्हणाले.

  संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार
  “शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे आक्रमकता आहे का? ते नाव घेऊ नका त्यांच्यावर प्रश्न विचारू नका. तो दुसरं कधी चांगलं काय बोलतो का? मी वाट पाहतोय शिंदे सरकार त्याचं संरक्षण कधी काढणार याची. संजय राऊत आदित्य ठाकरेसोबत आत जाणार आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आदित्य ठाकरे सुशांत सिंह केसमध्ये आतमध्ये जाणार. तिथं संजय राऊतदेखील सोबत असतील”, असा दावा नारायण राणेंनी केला.

  उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
  यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. “उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काय पैसे वाटणार आहे का?’मातोश्रीवर फक्त इनकमिंग आहे त्यांना आऊटगोईंग माहिती नाही.उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमक व्हायला कोणी आहे का? आक्रमकवाले सगळे गेले दुसरीकडे.उद्धव ठाकरे गटात आहे कोण तो गट तरी आहे का?” असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला.

  भाजपची नेहमीच तयारी
  भाजपने सगळी तयारी चालू केली असं समजायचं. भाजप कधी निवडणूक तयारी करत नाही? आमचा कार्यकर्ता घरोघरी जाऊन नेहमी निवडणुकीची तयारी करत असतो, असं राणे म्हणाले.