नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा, अंकुश राणेला कुठे मारलं,कुठे जाळलं? कळेल, ठाकरेगटाच्या नेत्याची मागणी

सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागतात.नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकभावना आहेत, असंही विनायक राऊत म्हणालेत.

    सिंधुदुर्ग : सत्य समोर आणायचं असेल. रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, बाळा या सगळ्यांच्या हत्यांच्या खोलाशी जायचं असेल तर नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा. नितेश राणेंना सोडा, नारायण राणेंची नार्कोटेस्ट केली तर अंकुश राणेला कुठे मारलं,कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील, असं ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत.

    सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागतात.नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकभावना आहेत, असंही विनायक राऊत म्हणालेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य वादात अडकलं आहे. त्यावरही विनायक राऊत बोललेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत आणि स्वराज्यरक्षकही आहेत, असं ते म्हणालेत.

    वैभव नाईक यांनीही नितेश राणेंवर टीका केली आहे.नितेश राणेंनी या आधी ही अनेकदा आरोप केलेत.पूर्वी नथुराम गोडसेच्या विरोधात बोलायचे आता बाजूने बोलता आहेत.नितेश राणे मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या भूमिका बदलत आहेत.पण नितेश राणे कितीही अजित पवारांवर बोलले,आदित्य ठाकरेंवर बोलले तरी भाजप नितेश राणेंना कधी ही मंत्री करणार नाहीत, असं वैभव नाईक म्हणालेत.