नरेंद्र मोदींनी स्वतःचे चिन्ह सोडून कधी दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला नाही; मनोज जरांगेंची मोदींवर टीका

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची सगळ्यांचं उत्सुकता लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील इतर नेते देखील महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत.

    राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची सगळ्यांचं उत्सुकता लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील इतर नेते देखील महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत. महायुतीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह हे वारंवार महाराष्ट्रात येऊन भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.याच प्रचार सभेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

    मनोज जरांगे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज आहे. आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहेत त्यांचा विचार करा. जे सगे सोयऱ्यांच्या बाजूने नाहीत त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नरेंद्र मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो आपले चिन्ह सोडून दुसया कोणत्या पक्षाचा प्रचार करताना दिसलेले नाही. मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये, असे म्हणत मनोज जरांगे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

    सांगलीमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञात व्यक्तीकडून चप्पलचा हार घालण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेक करण्यात आली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, असे कोणी कुणासोबत करू नये. प्रत्येकला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. काहीजण असे आहेत की ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत. काहीजण सहानभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत. मराठा असो किंवा ओबीसी असे कोणी केले नाही पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.