मोदीजी, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले? तुम्ही तर तरुणांची स्वप्ने भंग केलीत : राहुल गांधी

वाशिमच्या चौक सभेला जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा व मोदी सरकारवर तुफान टीका केली. ते म्हणाले की देशाचा कणा असलेला लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले, लाखो रोजगार गेले. दोन तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करत आहे. सामान्य जनतेसाठी नाही.

  • महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्दही काढत नाही

वाशिम : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन देशातील तरुणांची देऊन त्यांनी फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन ८ वर्षे झाली नोकऱ्या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदीने व्यापार उद्योग बंद पाडून करोडो लोकांचे रोजगार घालवले. देशातील तरुणांचे स्वप्न भंग केले, देशातील तरुण मोदींना नोकऱ्या कुठे आहेत ? असा सवाल विचारत आहेत पण मोदी गप्प आहेत असा हल्लाबोल खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारला.

वाशिमच्या चौक सभेला जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा व मोदी सरकारवर तुफान टीका केली. ते म्हणाले की देशाचा कणा असलेला लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले, लाखो रोजगार गेले. दोन तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करत आहे. सामान्य जनतेसाठी नाही. महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. गॅस ४०० रुपये, पेट्रोल ७० रुपये व डिझेल ६० रुपये असताना नरेंद्र मोदी युपीए सरकारवर कठोर टीका करत होते आता गॅस १२०० रुपये, पेट्रोल १०९ रुपये व डिझेल ९६ रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. सामान्य जनता , शेतकरी, कष्टकरी यांचे मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही.

युपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले पण मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही. बडया उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्ज एनपीएच्या नावाखाली मात्र माफ केली जातात आणि शेतक-यांना लाख दोन लाख कर्जासाठी त्रास दिला जातो. शेतमालाला एमएसपी मिळत नाही. तरुण शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहत आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. देशात हिंसा, द्वेष पसरवून समाजा- समाजात, जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. हा देश एकसंध रहावा, संविधान वाचावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे असेही राहुल गांधी म्हणाले.