नरेंद्र मोदींची ३० एप्रिलला धाराशिवमध्ये प्रचार सभा, सभेदरम्यान धाराशिव तुळापूर मार्ग सहा तासांसाठी राहणार बंद

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. राजकीय वर्तुळात अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

    आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. राजकीय वर्तुळात अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपमधील इतर नेत्यांचा समावेश आहे. तसेच पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. धाराशिवमध्ये मोदींच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रचार सभा ३० एप्रिलला धाराशिवमध्ये पार पडणार आहे. याच पार्श्ववभूमीवर ३० एप्रिलला मोदींची धाराशीमध्ये सभा, सहा तास धाराशिव-तुळजापूर महामार्ग राहणार बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे वाहनांची ये जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

    धाराशिवमध्ये राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अर्चना पाटील या निवडणुकीच्या रींगणात उतरल्या आहेत. त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून जरी उमेदवारी मिळालेली असली तरीसुद्धा त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यांच्या प्रचार सभेसाठी मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असल्याने त्यांच्या सभेची जोरदार तयारी केली जात आहे. ३० एप्रिलला सकाळी अकरा वाजता धाराशिव-तुळजापुर रस्त्यावरील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेमुळे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत काही भागातील रस्ते बंद केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार आहे.

    नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ धाराशिव-तुळजापूर हा महामार्ग सर्व वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. या बंदमध्ये पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील इतर वाहनांना या मार्गावरून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. धाराशिवच्या जागेवर अर्चना पाटील यांच्या विरुद्ध ओमराजे निंबाळकर असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.