nashik is a central location connecting kashmir to kanyakumari nitin gadkari nrvb

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात मे महिन्यात ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शनिवारी ( दि.१८) महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात ‘ऑटो अँड लॉजिस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : काश्मीर ते कन्याकुमारी (Kashmir To KanyaKumari) जोडणारे नाशिक (Nashik) हे मध्यवर्ती स्थान आहे. त्यासाठी आता मुंबई किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी भाजा, फळे, औषध साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज (Cold Storage) बनवले पाहिजे. जेणेकरुन माल खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतूक करणे (Transport) सोपे होईल. ज्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल व इंधनाची बचत होईल (The cost of transportation will be reduced and fuel will be saved). देशातील मध्यवर्ती स्थान पाहता भविष्यात नाशिक देशाची लॉजिस्टिक कॅपिटल (Logistics Capital) व्हावी व त्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी केले.

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात मे महिन्यात ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शनिवारी ( दि.१८) महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात ‘ऑटो अँड लॉजिस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले, हिमाचल प्रदेशमध्ये अटल टनल बनवल्याने साडेतीन तासांच्या रस्त्याचे अंतर साडेआठ मिनिटावर आले. तसेच लेह लडाख मार्गामुळे अंतर वाचणार असून इंधनाची मोठी बचत होणार आहे. इंधन म्हणून डिझेलचा पर्याय सर्वात महागडा व प्रदूषणकारी आहे. त्याऐवजी एलपीजी, सीएनजीचा स्वस्त व प्रदूषण विहरीत पर्याय उपलब्ध आहे.

टाटा, अशोक ले लॅण्ड या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक ट्रक निर्माण केले जात आहे. भविष्यात हायड्रोजनवर चालणारे ट्रक बनवले जाणार आहे. तसेच इंधन म्हणून बायो डिझेल, मिथेनाॅल हे पर्याय देखील उपलब्ध आहेत.

जैविक इंधन तयार करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी संधी आहे. मी स्वत:च्या ट्रॅक्टरसाठी जैविक इंधन वापरुन वर्षाला एक लाखाची बचत केल्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. भविष्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे त्यासाठी ट्रान्सपोर्ट इंड्रस्टीने तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांच्या हस्ते एक्स्पोच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘सारथी सुविधा केंद्र’ या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी.एम.सैनी, सचिव शंकर धनावडे, सेवा ॲटो मोबाईलचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव बाफना, जितेंद्र ऑटोमाबाईल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र शाह, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, एआयएमटीसीचे अध्यक्ष अमृतलालमदन, दिल्ली अध्यक्ष मलकतसिंग बल, महाराष्ट्र महासंघ अध्यक्ष प्रकाश गवळी, बी.जी.टी.अे सचिव सुरेश खोसला आदीसंह सल्लागार समिती, पदाधिकारी व संघटनेचे सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन परी ठोसकर यांनी केले.

शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभारावे

नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण बघता शहरात होणारी वाहनांची गर्दी व प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहराबाहेर ट्रान्सपोर्ट नगर उभारावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. द्वारका चौकातील वाहतून कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी पूल बांधला. आता आपण डबल डेकर पूल बांधत आहोत असे त्यांनी सांगितले.

बक्षीस वितरण सोहळा

एक्स्पो उपक्रमांअंतर्गत मविप्र केबीटी अभियांत्रिकीब महाविद्यालयात ‘नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व पोस्टर सादर केले होते. त्यातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.