नाशिकचं मासिक पाळी प्रकरण काही निवळेना, आता मुलीची राज्य बाल हक्क आयोगाकडे मागितली दाद

मासिक पाळी आल्यामुळे शाळेत विद्यार्थिनीला वृक्षारोपण करू न दिल्याने हे प्रकरण समोर आलं होतं. मुलीने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.

    नाशिक : मासिक पाळी सुरू असल्याने आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीला शाळेत वृक्षारोपण करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या प्रकरणी आता रोज नवी नवी माहित समोर येत आहे. मुलीच्या तक्रारी नतंर आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तीने हा सगळा बनाव रचल्याचं माहिती समोर आलं होतं मात्र, आता या प्रकरणी पुन्हा नवा ट्विस्ट आला असून आता या मुलीने राज्य बाल हक्क आयोगापुढे आपली कैफियत मांडली आहे.

    मासिक पाळी (Menstrual Cycle) सुरु असल्याने एका मुलीला वृक्षारोपण करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवागाव आश्रम शाळेत ही घटना घडल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी चौकशी (Inquiry) करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. पीडित मुलगी ही बनाव करत केल्याचा अहवाल चौकशीत पुढे आला. परंतू आता पीडित मुलगी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणानंतर आश्रमशाळेतील सर्वच शिक्षक (Teacher) अडचणीत आले आहेत.